STORYMIRROR

Yashodhan Waghmare

Others

2  

Yashodhan Waghmare

Others

बाणाईच्या गावाला

बाणाईच्या गावाला

1 min
2.8K

धनगर वाड्याला जाऊया, गं बाई

धनगर वाड्याला जाऊया

अंगात-रंगात काशीच्या भंगात

डुबुन पुन्हा पाहूया


लपून-छपून कायेचे पांगरून

हळूच बघून घेऊया

डोलत-फिरत हिरवं रानात

हरवून कळपात जाऊया


म्हाळसा मनात वचन देण्यात

भंडारा पुन्हा ऊधळूया

घोंगडी भिजत

भांडण शिजत

पण दिलेले वचन पाळूया, गं बाई

धनगर वाड्याला जाऊया

गं बाई

धनगर वाड्याला जाऊया


येळकोट येळकोट

जय मल्हार


Rate this content
Log in