प्रेमात तुझ्या
प्रेमात तुझ्या
नाजूक तुझ्या प्रेमात
मन हे माझं दंगते
तुझ्यात मी दिवसा
रोज हळूहळू रंगते
तुझी चाहूल लागी
मन जाई हरवूनी
मी स्वतः तुझ्यात
जाते हळूच मिसळूनी
तुझ्यात तरी काय
प्रेम होऊनी जाते
प्रेमात तुझ्या मला
नशा ही चढून येते
तुझा गोड स्वभाव
मन मोहून टाकते
तुझ्याशी मला रोज
बोलतच राहू वाटते
हसणं तुझं बघून
बघतच मी राहावं
तुझ्यापासून मी लांब
एकटं कधीच न राहावं
तुझ्या गप्पा ऐकून
फक्त शांत मी बसावं
तू बोलतच राहावं
तुझं बोलणं मी ऐकावं
बोलता बोलता डोकं
मांडीवर तुझ्या ठेऊ
आनंदाचे पूर्ण क्षण
मी मन भरुनी घेऊ
तुझ्यासंगे मज
आवडे प्रेम करायला
आयुष्यात तुझ्या लागे
जीवनभर राहायला

