प्रेमात धुंद होताना
प्रेमात धुंद होताना
प्रेमात धुंद होताना
प्रेमरंगी रंगताना
तुझीच होऊन जाते मी
तुझ्या सवे असताना
येते प्रेम आकारूनी
येते प्रेम बहरूनी
तुझ्या डोळ्यात मी
मज बघते तेव्हा
भासे हा एकच जीव
वाटे ही एकच छाया
श्वास असले वेगळे तरी
जरी आहे वेगळी काया
तू सोबत असताना
जाणवे उन्हात ही शीतलता
दरवळत राहते अत्तर
तुझे तू नसताना
प्रेमात आपली बरकत राहो
बहरत राहो ते सदा
न असावे त्यात कलह
न यावा कधी दुरावा
नको तो पोणि॓मेचा चंद्र
नको ते टिमटिम तारे
सात ही जन्म मला
तूच हवा सख्या रे