प्रेमाचं गणित कळेना
प्रेमाचं गणित कळेना


सजणा विचारतोस मला
चल सजणी जाऊ फिरायला
ने तरी नाही कुठं धड बाहेर मला
नुसता म्हणतो जाऊ सिनेमाला....
फिरायला नेत नाही काही
सिनेमा दाखवत नाही मला
तुझ्या प्रेमाचं गणित कळेना
अरे खरच प्रेम आहे ना तुला.....
मी म्हणत नाही बाहेरच ने
कधीतरी काढ दिन माझ्यासाठी
मी पण लवकर आवरीन सारं काम
वेळ खास राखून ठेवीन तुझ्यासाठी....
मस्त दोघच घरातच आराम करूया
दोघांनी एकमेकांना समजून घेवूया
यातही प्रेम आहेच की साजना
प्रेमाच्या गप्पात रंगून जावूया.....