❤️ व्हॅलेंटाईन डे ❤️
❤️ व्हॅलेंटाईन डे ❤️
फुल आणि चॉकलेट देऊन
कुणी प्रेमात पडतंय का ?
नुसत्याच घेऊन आणा भाका
मनात कुणी भरतंय का ?
जग आहे बनावटी
सुंदर सापळा कुणी लावतंय का?
वेळीच जागी हो गं हरिणी
कुणी जाळ्यात ओढतंय का ?
रोज डे, प्रपोज डे
मनात कळी खुलतेय का ?
चॉकलेट आणि , टेडी देऊन
हृदय कुणी चोरतंय का ?
किस आणि मिठी मारून
ओढ अशी राहतेय का ?
सात दिवसांत असे
सात जन्माची सोबत होते का ?
प्रेम असे दिवसांमध्ये
मोजता येतंय का ?
प्रीत अशी अटीमध्ये
बांधता येते का ?
सुख दुःखात प्रत्येक क्षणी
साथ माझी करशील का ?
आदर, प्रेम, जिव्हाळ्याने
आयुष्य सुगंधित करशील का ?
भाकरीचा चंद्र शोधताना
विश्वास माझा जपशील का ?
माझ्यावरच्या तुझ्या प्रेमाचे
पेटंट मला देशील का ?