प्रेमाची प्रतीक्षा -2
प्रेमाची प्रतीक्षा -2
सायंकाळच्या नभात
सोनेरी किरणांची बरसात
तसाच मी ही
तुझ्या प्रेमात.....
वेडावलेला मी,
तुझ्या मागेच झुरत असतो...
तु नसता,
जणू मला झालेला आभास...
तुझी माझी भेट
हा जणू नियतीताच खेळ
गर्द झाडांत,
वाऱ्याची ती झुळूक ही
मला आपलसं करते,
जणू तुच मला बोलावतेस....
रात्रीच्या आकाशात
चांदण्या रातीत,
तो चंद्र ही वाट पाहतो...
तुझ्या माझ्या सोनेरी प्रेमाची
अंधारातले काजवेही आता चमकु लागले,
तुझ्या माझ्या प्रेमात सप्तरंगी रंगाची उधळण करु लागले....
पावसाळ्याला ही लागली जणू आपल्या प्रेमाची आस.....
थांबा थांबा करता करता
करतो धुवांधार बरसात....
आपल्या प्रेमाची कहाणी अशीच लिहली जाईल सोनेरी अक्षरात.....

