STORYMIRROR

Kirti Borkar

Romance Tragedy

4  

Kirti Borkar

Romance Tragedy

प्रेमाची भावना

प्रेमाची भावना

1 min
681

तू नसशील तरी 

मी लिहित राहणार

माझ्या भावनांना

कवितेत मांडणार


नाही दिला नकार

मी प्रेम करणार

साध्या शब्दांनीच

प्रेम माझे जपणार


साथ नसली तरी

सोबत धरून चाल

दोन शब्द प्रेमाचे

माझ्या कानी घाल


बोलत जावे कधी

मनात आहे तुझ्या

आठवणींना कधी

विसरू नको माझ्या


तुझ्या त्या स्पर्शाला

मंद असा सुवास

आजही आठवतोय 

अडकलेला तो श्वास


प्रेम केलं तुझ्यावर

पुन्हा होणार नाही

तुला कधी विसरणे 

मला जमणार नाही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance