STORYMIRROR

Shraddha Kandalgaonkar

Romance Classics

3  

Shraddha Kandalgaonkar

Romance Classics

प्रेमाचे रंग

प्रेमाचे रंग

1 min
195


डोळ्यांची भाषा माझी, तुझ्यासमोर,

तू मात्र प्रेमाची भाषा शब्दात शोधतेस..


स्पर्शाच्या भाषेचा निःसीम मी चाहता 

तू मात्र तिथेही अंग चोरशी मला पाहता


तुझ्या केसाच्या अंधारात मला हरवायला आवडते ,

तू मात्र बांधून केसांच्या मुसक्या मला उघडे पाडतेस


गालावरल्या खळीत मला झोकून द्यायचे असते 

तू मात्र गाल फुगवून खळीच हरवून बसतेस


हातात घेऊन हात मला चालायचे असते जन्म सात,

तू मात्र वळणावर झटकन वळतेस ,हलवून तुझा हात


शृंगाराच्या नवनवीन विचारात मी दंगी,

तुझी मात्र झोपेशी भलतीच सलगी


विचारांची ही तफावतआड येत नाही प्रेमात

तरीही एकदाच विचारतो प्रिये

करशील का माझ्या इच्छा पूर्ण 

तू येऊन माझ्या स्वप्नात



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance