STORYMIRROR

Deepa Vankudre

Romance

4  

Deepa Vankudre

Romance

प्रेमाचे अंतरंग

प्रेमाचे अंतरंग

1 min
452

कळी गालावर खुललेली, 

ओठांवर शब्द थबकलेले,

नजरेत नमता ती सलज्ज,

हृदयाचे ठोके चुकलेले!


मोगरा फुललेला वेणीवर,

बट गालावर रुळलेली,

मनाची नाव भावनेच्या, 

आर्त लाटेवर उसळलेली!


सा-या खुणा ह्या वदतात,

उमलणारे प्रेमाचे अंतरंग,

सागरावर उठणारे जणू, 

असंख्य प्रतिबंधित तरंग!


प्रेमाची न आर्या, व्याख्या,

प्रेमाला न भाषा, बोली,

प्रेम हे उत्तुंग, अफाट, उदात्त,

कोणी मोजली का खोली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance