STORYMIRROR

Ujwala Rahane

Romance

3  

Ujwala Rahane

Romance

"प्रेमाचा पदार्थ"

"प्रेमाचा पदार्थ"

1 min
169

  स्वयंपाकघरात घरात पसारा सारा. 

त्यातूनच सजला पदार्थ निराळा.

वेगळा पदार्थ वेगळा थाट, 

घरभर दरवळला भाजीचा घमघमाट.


  स्वारीच्या हाताला चवही भारी,

रसना भुकेने चाळवली.

तव्यावरची पोळी देखील टम्म फुगली,

माझ्याकडे तिरका कटाक्ष टाकून खुदकन हसली.


  हळूच फळीवरची भांडी

नयनानेच मला खुणवू लागली,

अग सतत तुझ्याच आम्ही सहवासात, 

असू दे ग कधीतरी स्वारीचा 

ही वावर स्वयंपाकघरात. 


 मिसळणीचा डबा देखील खुश झाला,

गॅसवरील तवादेखील मला कोपरखळी मारून गेला. 

 स्वारीचा बेत मात्र फक्कड झाला.

ओट्यावर घातलेल्या पसाऱ्याचा क्षणभर राग मलाही आला. 


 मागचा हा ओट्यावरचा पसारा आता आवरायचा कोणी?

मी स्वारीला थोडा रागातच सवाल केला. 

मग ओटा माझ्या कानात कुजबुजला!! 


 अग तूच या घराची लक्ष्मी,

तुझा हात फिरताच आम्ही सगळेच धन्य होतो मनी!.

 हा लबाड ओटादेखील मला हरभऱ्याच्या झाडावर चढवून गेला.

स्वारीच्या हातचा फक्कड बेत खरंचंच कळत नकळत मला सुखावून गेला.


 जिभेची लालसा तर वेगळीच भागवून गेला.

आज कर ना थोडा आराम, दु:ख तुला हे मनी कसले?

स्वारीचे प्रेमळ शब्द माझ्या कष्टाचे नि श्रमपरिहाराच्या

कहाणीचे चीज सुफळ संपूर्ण करायला खरंच कदापिही नाही विसरले!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance