STORYMIRROR

Savita Kale

Romance

4  

Savita Kale

Romance

प्रेमाचा बंध

प्रेमाचा बंध

1 min
559

नजरेची भाषा

स्वप्नांची आशा

प्रेमाची असते

निराळी परिभाषा


मन होई चंचल

जग वाटे सुंदर

प्रेमात नसते

कसलेही अंतर


श्वासात माझ्या

तव प्रेमाचा गंध

न तुटणारा जुळला

हा मनाचा बंध


मनाच्या शिंपल्यात

जपलेली मोती

त्यासम भासे

माझा जीवनसाथी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance