प्रेमाच वारं
प्रेमाच वारं
कधीतरी सुचाव
कधीतरी सुचतच रहावं
हल्ली असच घडतंय सार
शिशिरात ही वसंताचा वर्षाव करणार
असत का प्रेमाचं वारं
कधीतरी चालावं
कधीतरी चालतच राहावं
असच असत सार
उन्हातही पावसात भिजवणार
असत प्रेमाच वारं
कधीतरी ऐकाव
कधीतरी ऐकतच राहावं
असच असत सार
तिच्या अबोल हास्यात होकार शोधणार
असत प्रेमाच वारं
कधीतरी हसावं
कधितरी हसतच रहावं
असच असत सार
तिच्या खळखळून हसण्यात मला आनंद देणार
असत प्रेमाच वारं
मांडतो व्यथा मग तुजपाशी
उत्तरास मन कासावीशी
हतबल जीव आटून जाई पार
मग हसतच म्हणते ती
"हल्ली होत अस ,जेव्हा लागत प्रेमाचा वारं "

