STORYMIRROR

R U Salunke

Romance

3  

R U Salunke

Romance

प्रेम...

प्रेम...

1 min
264

कृष्णा बासरी

राधा लाजरी, 

ऐकत असे

नदी किनारी..1


प्रेमाची गोडी

लागे आवडी, 

सांज ती वेळ

दंग ती वेडी..2


गीत प्रेमाने

गाती कंठाने, 

सूर जुळती

ती लयतेने..3


बागडी वना

गोकुळ राना, 

बुडती प्रेमा

ना रुक्षपणा..4


संवाद कसा

आल्हाद असा, 

प्रेमाची शब्द

मोकळी श्वासा..5


प्रेम निखळ 

नसे उथळ, 

होई व्यक्त ते 

मने प्रांजळ.. 6


आदर्श त्यांचे 

आहे प्रेमाचे , 

कसे करावे 

सार्थ जन्माचे.. 7


त्यांना आठवू 

मना साठवू , 

प्रेम सदैव 

तेवत ठेवू ..8


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance