प्रेम..
प्रेम..
जगा वेगळ भासे एक जग
असच जरा हटके तिच प्रेम
कुणास ठावे कसे जुळती हे नाते जन्मो जन्मीचे ..
नाव कसे येते ओठी कोणा अनोळखी मनाचे..
नाते मनीचे होते जुळलले नाते गतजन्मीचे ..
अवचित चाहुल मनी प्रिती कुणाची हसे ..
कोण जाणे कशी मनी प्रियाची आस जागे
न सांगता कोरले तीने ते नाव मेहंदीत ही.......
त्यासाठी जगली ती खास दुवे अबोल प्रेमाचेते ते ही..
नव्हते आकृतीबंध त्यासारीखा कोणी जगी
न ओळखता कसा जीव जाळाला तिनी असा...
प्रश्न तिचाच होता उत्तर ही तिच देत होती ..
काळ होता तो की जीवन काय तिलाच समजेना ...
त्यासाठी मन झुरतेय येवढ काही ती विसरेना..
कशी बशी केली तीने मनावर सरशी ..
मनात ल नाव ओठी न आणले कधी..
तरीही नशीबी एक उपकार राहिला की काय..
परिक्षा च जणू नाव च माणूस आल समोरी
धडकी उरात उगाच भरली
काय होत आहे तिला न कळल...
नाव घेता कोणी तिच मन आणखी झुरल..
ओढ आतुर काळीजी काहूर माजलं..
धिर चालला सुटत नयनी ओझरतं होते अश्रु..
अनावर होते प्रिती कधी..
कधी डोळस होते मनी ओढ प्रिया ची ..
का केली ती अनाहुत एक आस ..
का जगली ती क्षण क्षण आयुष्य ते खास..
तिला ही कळल नियतीच डाव खेळते एक खेळ..
होत आहे जिवंत अभसिक प्रियकर..
नावात असे काय सखे बोलत
झिडकारले तीने ते प्रेमदुवे ..
ओंजळीत आश्रु ची सामवली होती फुले..
होता आभास ही खरा प्रश्न पडला तिच्या मनाला
काय झाल तुला मना जगण असकस तू विसरला..
एकाकी असे आपुली वाट
भानावर ये जरा तू आज..
लिहिता नाव मेहंदीत ही मनी कोरले होते अनामिक भाव..
आज वर कुठला नसे त्या स्वप्नचा गाव..
दाविशी उगा का माजला तो चेहरा
लपविला जो मनीच्या दर्पणी तयाचे नाव..
त्याच्या नावात च होते तीचे सारे आयुष्य तीने बांधीले..
वडाच्या परंब्यास ही तियेचे हे भाव होते कळले..
नशीबी तिच्या नव्हते ते नाव कोरले..
एक एक अश्रु त्याने ही तिच्यासाठी गाळले..
ती होती च कोण त्याची मोरपीसि स्वप्न ते उरिचे..
असे जगली एकाकी जीवन सारे
भान हरपून केली असे प्रिती त्याच वरी तीने..
अशी कशी कथा होती
एक तर्फी होती ती आस ..
संपवीले तीने ते श्वास प्रेमाचे ..
जागवली न उरी प्रिती भाव त्या सागराचे..
लहरी वर होता स्वार लाटा आज ही.
येतात आसवांच्या रुपात भिजवून जातात मनाला तिच्या..
नाव मनीचे कोरले होते..
भाव मनी ते जपले ही होते ..
अल्वार जाहला असे आगमन तयाचे..
विस्कटले ते जग तिच्या अस्तित्वाचे..
भान वर येता कळले
जगात तिच्या फक्त तोच वसे..
काहुन अशी जगली ती प्रिती ...
भेट होता खरी का जाहली ती दरी ..
खोल अंतरीचा एक एक श्वास
झुरतो तिज्सवे चंद्र ही आज..
का कोण जाणे ती ने हा खेळला नशिबाचा खेळ..
कथा होती ती कथा च राहिली तयाची प्रिती ..
सत्यात होती जगत ती स्वप्नात त्यासवे पण ..
नियतिस कसे फासे उलटे फिरले
नाव वर केली प्रिती नाव चे माणूस तीने जन्मास घातले..
असेच काहीसे तिच्या मनी आले..
त्याचे असणे तीने ही मान्य केले ..
पण त्यासाठी हा जन्म नाही ..
भाग्य तीचे ही इथे ही फुट्के निघाले ..
जगता येईल त्यविना ही
श्वासात उरेल ही मारवा..
डोळ्यात साठवत भाव
अदृश्य केले तीने ते स्वप्नीचे एक गाव ..
उरल्या त्या आठवणी ..
तिच्या मनीचे ते नाव .. अन
भावनेशी नियतीने खेळलेला डाव..
होता होता त्याची ती अचानक वेगळी वाट चालली..
असता मनी तो .. तीने जग त्याच्यासाठी सोडले ..!!!
असे का घडले .. विचारता कोणा ???????
तीने तर जग सोडले😢 .. 🌹💕

