STORYMIRROR

Bharati Sawant

Romance

3  

Bharati Sawant

Romance

प्रेम

प्रेम

1 min
235

जाऊया हरवून दोघे 

एकमेकांच्या प्रेमात

रंगवू दोघे रासलीला

साऱ्यांच्याच मनात


वाटू नये खंत कधी 

प्रेमी जीवांना प्रीतीची

नकोच वल्गना वंचना

नसावी व्यर्थ भीतीची


रूणझूण तुझे हे प्रेम

जणु पाखरू पाखरू 

जीवलग प्रिया माझी 

प्रेमाला कसे विसरू 


मुखचंद्रमा हा पाहता

फुलतेय ओठी हासू 

नाही पहावणार सखी

नयनातील माझ्या आसू


ओळखीची खूण पहा

घालूनी डोळे डोळ्यात 

चल जाऊया जोडीनेच

फुललेल्या प्रेममळ्यात 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance