STORYMIRROR

Raakesh More

Romance

4  

Raakesh More

Romance

प्रेम

प्रेम

1 min
135

प्रेम ठरवून होत नसतं

प्रेम हरवून होत नसतं

प्रेमात जबरदस्ती नसते

प्रेम कोणाकडून सक्तीने करवून होत नसतं||धृ||


प्रेमात पडणं असलं तरी

प्रेम परमोच्च सुखाची अनुभूती देत असतं

प्रेम अध्यात्मासारखं सतत

वरच्या पातळीवर नेत असतं||1||


प्रेमात शरीरसुखाची हाव नसते

प्रेमात वासना नसते

प्रेम निखळ असतं

प्रेमात केवळ उपासना असते||2||


प्रेम हृदयाच्या गाभाऱ्यातून केलं जातं

प्रेम एक मंदिर असतं

प्रेमात ठहराव असला तरी

मन सतत अधीर असतं||3||


प्रेमात कोणता धर्म नसतो

प्रेमात कोणती जात नसते

प्रेमाच्या वादळासारखा

दुसरा कोणता झंझावात नसतो||4||


तिला मिठीत घेऊन

तिचे केस कुरवाळण्यात प्रेम आहे

तिच्या आठवणीने एकटेच

झुरण्यात प्रेम आहे||5||


प्रेम फक्त व्यक्त करावं

प्रेमाची अपेक्षा करू नये

प्रेम फक्त देत राहावं

प्रेम मिळावं ही आस धरू नये||6||


आपली सुखं तिला देऊन

तिचं दुःख मागणं हे प्रेम आहे

तिला तुम्ही पसंत नसाल तर

तिला कायमचं जाऊ देणं हेही प्रेम आहे||7||


प्रेम समजून घेणं

प्रेमाचा बाजार मांडणाऱ्यांना काय समजणार

रस्त्यात प्रत्येक वळणावर

हृदय सांडणाऱ्यांना काय समजणार||8||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance