प्रेम पाहिजे
प्रेम पाहिजे
एकटे, एकटे
कसे चालायचे
एवढं मोठं आयुष्य
कसे जगायचे
असावं कोणी सोबत
आपल्या नेहमी
सुख दुःखात साथ देईल
ही पाहिजे हमी
डोळे मिटून ठेवावा
विश्वास ज्यावरी
समजून घेणारं आपलं
असावं कोणीतरी
नाही पैसा, नाही थाट
मग काय पाहिजे
जगायला श्वास
अन् प्रेम पाहिजे

