प्रेम नाही मागायचं
प्रेम नाही मागायचं
कधीच कोणत्या मुलीकडे
प्रेम नाही मागायचं
प्रेमात कमजोर व्यक्तीसारखं
मुळीच नाही वागायचं ||0||
दाखवू नको हृदयात तूझ्या
प्रेम किती आहे मित्रा
दाखवलेस तर हृदय तुझे
तुटण्याची भीती आहे मित्रा
किती अधीर आहेस हे
मुळीच नाही सांगायचं
प्रेमात कमजोर व्यक्तीसारखं
मुळीच नाही वागायचं ||1||
अति प्रेम करणाऱ्यांचंच
हृदय इथे तोडलं जातं
असफल प्रेमवीरांच्या
रांगेत इथे जोडलं जातं
निष्ठुर असतात मुली यांच्या
नादी नाही लागायचं
प्रेमात कमजोर व्यक्तीसारखं
मुळीच नाही वागायचं ||2||
खेच तिला स्वतःकडे
स्वतः खेचला जाऊ नकोस
तांदळातल्या खड्यासारखा
अलगद वेचला जाऊ नकोस
अवती भवती तिच्या आता
मुळीच नाही रांगायचं
प्रेमात कमजोर व्यक्तीसारखं
मुळीच नाही वागायचं ||3||
होईल निस्तेज जग सारं
उमेद सारी नष्ट होईल
गळून जाईल अवसान सारं
मनालाही कष्ट होईल
आता मात्र निराश होऊन
मुळीच नाही पांगायचं
प्रेमात कमजोर व्यक्तीसारखं
मुळीच नाही वागायचं ||4||
व्यक्त नजरेत करतात मित्रा
कोमल नाजूक भाव
गल्लत होते समजून घेण्यात
यांचा फसवा स्वभाव
दाखवतात नजरेत जे तुला
मुळीच नाही वाचायचं
प्रेमात कमजोर व्यक्तीसारखं
मुळीच नाही वागायचं ||5||

