प्रेम म्हणजे...
प्रेम म्हणजे...
प्रेम म्हणजे...भावनांचा मनोरा
प्रेम म्हणजे...जातपातधर्म विसर
प्रेम म्हणजे...माणसातला माणूस कळणं
प्रेम म्हणजे...निसर्गात रमवणारं
प्रेम म्हणजे...अपेक्षांमधे गुंफणं
प्रेम म्हणजे...प्रतीक्षेची गोडी लावणारं
प्रेम म्हणजे...स्वप्नांची पूर्तता
प्रेम म्हणजे...ध्यास नव्याचा
प्रेम म्हणजे...विचारांचा संवाद
प्रेम म्हणजे...मस्तीत जगण्याचा सोहळा
प्रेम म्हणजे...दुराव्यातला रंग
प्रेम म्हणजे...छंदाचं आनंदवन
प्रेम म्हणजे...सहवासाचा उत्सव
प्रेम म्हणजे...समाधानाची साथ
प्रेम म्हणजे...आपुलकीची माया
प्रेम म्हणजे...स्पर्शातली व्याकुळता
प्रेम म्हणजे...विश्वासाचा तोफा
प्रेम म्हणजे...स्वतःतल्या स्वला शोधणं
प्रेम म्हणजे...समजुतीचा स्वैराचार
प्रेम म्हणजे...धैर्याचा स्वच्छंदी आस्वाद
प्रेम म्हणजे...मनमुरादी जगणं

