STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Romance

3  

Abasaheb Mhaske

Romance

प्रेम करावं...

प्रेम करावं...

1 min
15.1K


प्रेम कुणावर, कुणी करावं 

केंव्हा अन कसं करावं ?

हे काय कुठं लिहलेलं असत ?

प्रेम तर असत सहज भावना 

चंचल मन कधी भिरभिरतं

स्व: विश्वात हरवून जातं 

कळत - नकळत खूप काही घडतं 

प्रेम कधी का विचारून होतं ?

प्रेम उत्कट असं असतं की ,

क्षणभर जगाला विसरायला होतं  

आयुष्यच सारं बदलूवून टाकतं

प्रेम कधी का ठरवून होतं ?  

प्रेम असतं ईश्वराचं प्रतीक 

प्रेम असतं सदैव भावनिक 

प्रेम करावं कुणीही कुणावर 

भरभरून बिनधास्त, मनसोक्त.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance