प्रेम झरा
प्रेम झरा
हृदयातून वाहे
निर्झर प्रेमाचा
शांत मनातून
प्रेम भावनांचा
फुटता पाझर
प्रेम दाखवता
ओसंडून वाहे
माया व ममता
निरागस हास्य
गाली उमटता
झरझर वाहे
प्रेम रसिकता
सौंदर्य पाहून
प्रेम दाहकता
वाढे या मनाची
चलबिचलता
हा एकच स्त्रोत
हृदय भावनेचा
पाझरे मनात
निर्झर प्रेमाचा

