प्रेम हे असं असतं?
प्रेम हे असं असतं?
वेलीवरचं फूल तोडण्याइतकंच
सोपं असतं यांना दिल तोडणं।
फुलांचा त्याच वापर करून
जमवू पाहतात हे दिल जोडणं।।१।।
दिल यांचं दिल नसतं तर
हॉटेलिंगचं गलेलठ्ठ बिल असतं।
म्हटली तर मजा अनुभवण्याचं
एक थ्रिल फक्त असतं।।२।।
समोरच्या व्यक्तीविषयी फक्त
समथिंग समथिंग फील असतं।
नाहीतर पाहिजे तेव्हा वापरून
तिला चुरगाळून फेकलं नसतं।।३।।
पाडगावकरांच्या भाषेत प्रेम
म्हणजे प्रेम म्हणजे प्रेमच असतं।
एकमेकांच्या सुखासाठी फक्त
एकमेकांनी झुरायचं असतं।।४।।
एकमेकांसाठी झुरताना स्वत:च्या
संसारासाठी उरायचं असतं।
दोघांनीही शेवटी आपलं घर हे
आपणच सावरायचं असतं।।५।।
स्वत:ला सावरुन क्षणिक
वासनांना आवरायचं असतं।
निकोप नितीमान समाजासाठी
हे बलिदान करायचं असतं।।६।।
राजरोस असं प्रेमाचं प्रदर्शन
गावभर मांडायचं नसतं।
जमलंच तर एकमेकांसाठी
गावाशीही भांडायचं असतं।।७।।
आपण जगताना समाजहिताचंही
रक्षण करायचं असतं।
आपणच आपलं चांदणं होऊन
आकाशभर पसरायचं असतं।।८।।
भावनांशी एखादीच्या खेळून असं
नसतो करायचा टाईमपास।
नाहीतर एखाद्या बिचारीच्या
गळ्याला समाज लावतो फास।।९।।
यांचा म्हणे खूप खेळ छान होतो
त्या बिचारीचा मात्र जीव जातो।
Valentine Day चा सा-यांना
अखेर संदेश चुकीचा जातो।।१०।।
प्रेम हे स्वप्नील असत्य मानून
जीवनात निराश व्हायचं नसतं।
जर आपल्यानं हे नसेल होणार
तर मुळीच प्रेम करायचं नसतं।।११।।

