STORYMIRROR

Venu Kurjekar

Romance Fantasy Others

3  

Venu Kurjekar

Romance Fantasy Others

प्रेम एक भावना

प्रेम एक भावना

1 min
207

प्रेम , एक भावना

रम्य एक कल्पना.

मन बनतं मोरपीस

एकाकी मनाला लाभलं परीस. ......


प्रेम, अथांग डोह,

कधी खळाळता झरा.

कधी मंद मंद झुळूक

कधी खट्याळ वारा......


प्रेम, पारिजात फूल

कधी नाजूक सुगंधी बकूळ.

कधी अनामिक हुरहूर

कधी हळवे व्याकुळ......


प्रेम, निष्पाप, निर्व्याज

कधी स्वार्थी, सव्याज.

उमगत नाही प्रेमाची परिभाषा

पण प्रेम जगन्याची आशा......



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance