॥ प्रेम दिन ॥
॥ प्रेम दिन ॥
प्रेमाचा तो एक दिवस १४ फेब्रुवारी
क्षणाक्षणाला सगळ्यांना प्रेम मिळो घरोघरी
प्रियकर प्रेयसीची वाट बघत आहे झाडाखाली
ती पण त्याला भेटायला आतुर झाली खरी
मनाची घालमेल, पानांची सळसळ
नाजुक क्षण वेचायला दोघांची तळमळ
आय लव्ह युची कुजबूज कानात,
अबोल प्रेमाची भाषा
दाही दिशा चकचकीत उजळल्या कशा
प्रेमाची जादु, नजरेची भेट
घायाळ करुन टाकतात हृदयाला थेट
ओठांवरचे लाडिक हास्य, गालावरची खळी
दिसते साधीभोळी, पण चतुर नार खरी
सौंदर्याची पाडते भुरळ, प्रेमदिवाणा प्रेमाचा चेला
काठोकाठ भरलेला सदैव राहू दे इश्काचा प्याला

