STORYMIRROR

ज्ञानेश्वर आल्हाट Dnyaneshwar Alhat

Romance

5.0  

ज्ञानेश्वर आल्हाट Dnyaneshwar Alhat

Romance

प्रेम धन

प्रेम धन

1 min
960


प्रेम म्हणजे तुझा मेसेज

प्रेम म्हणजे माझा फोन

प्रेम म्हणजे रात्र वेडी

प्रेम म्हणजे वेडे दोन


प्रेम म्हणजे तुझा आवाज

प्रेम म्हणजे तुझ हसणं

प्रेम म्हणजे तुझं असणं

प्रेम म्हणजे तुझं रुसणं


प्रेम म्हणजे बोल ना

प्रेम म्हणजे काय बोलू

प्रेम म्हणजे महित नाही

प्रेम म्हणजे काहीच नाही


प्रेम म्हणजे माझे प्रश्न

प्रेम म्हणजे तुझे प्रश्न

प्रेम म्हणजे उत्तर असणं

प्रेम म्हणजे शब्द नसणं..


प्रेम म्हणजे कोमल मन

मिळालेलं जे मला धन......✍


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance