STORYMIRROR

Ganesh G Shivlad

Romance

3  

Ganesh G Shivlad

Romance

प्रेम भावना

प्रेम भावना

1 min
370

श्वास गुंतावा श्वासात,

देह मिळावा देहात,

व्हावा एकरूप आत्मा,

इच्छा असे या मनात..!


व्हावे मिलन एकांती,

तनमन व्हावे तृप्त,

व्हावे प्रेम तुझे माझे,

मनातूनी या मनात..!


हरपावे देहभान,

मिलनाने आनंदात,

सुख मिळावे स्वर्गीचे,

तुझे माझे या मनात..!


रंग तुझ्याच छायेचा,

लाभो माझे जीवनात,

गंध सांडून मायेचा,

यावा सुगंध मनात..!


प्रेम भावना तू माझी,

समजून घे हृदयात,

ध्यास असे फक्त तुझा,

वेड्या माझिया मनात..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance