प्रेम आटत नाही
प्रेम आटत नाही
तुझ्या विरहाची
भीती वाटंत नाही
तू दूर असतानाही
प्रेम आटत नाही || 0 ||
काहीतरी जुनी
ओळख आहे हे कळतं
गतजन्माचं जग
धूसर उसळतं
मनात कसलीही
शंका दाटत नाही
तू दूर असतानाही
प्रेम आटत नाही || 1 ||
तू माझीच आहेस ही
खात्री नक्की आहे
तुझा जन्म माझ्यासाठी
धारणा पक्की आहे
मनात तुझ्या का माझं
प्रेम थाटत नाही
तू दूर असतानाही
प्रेम आटत नाही || 2 ||