STORYMIRROR

Prashant Tribhuwan

Tragedy

4  

Prashant Tribhuwan

Tragedy

प्रदूषण मुक्ती

प्रदूषण मुक्ती

1 min
259

जिकडे पाहावे तिकडे

चालू आहे प्रदूषण

मानवचं ओढावून घेतोय

स्वतःवर संकट भीषण


येणाऱ्या या संकटाला

पळवून आपण लावू

येत्या पिढीला आपण

हिरवा निसर्ग दावू


रक्षिण्या आज स्वतःला

निसर्गाला वाचवावे लागेल

एक माणूस एक झाड

तरी खूप काही भागेल


असेल झाडे या मातेवर

तरच शोभा या जगण्याला

नाहीतर मिळणार नाही आता

पाणी देखील रडण्याला


विसरून सारा भेद

प्रत्येकाने पुढे यावे

होईल तसे साऱ्यांनी

आपले योगदान द्यावे



प्रशांत त्रिभुवन


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy