STORYMIRROR

Anju Metkar

Tragedy

3  

Anju Metkar

Tragedy

प्राण

प्राण

1 min
212

एका चैतन्यावाचून

दशदिशा या कोंंडल्या

कंठास प्राण आले

श्वास का तव थांबला ।।१।।


वृृक्षवल्लरी वने तोडता

हाथ का तव पिसाटला 

निसर्गदत्त देणगीचा 

सुखद स्पर्श तू अव्हेरला ।।२।।


अवनी वस्त्रहरणाचा 

खेळ तूच मांंडला 

इंंच इंच भू हव्यासाचा

ध्यास का न तू सांडला ।।३।।


जीवो जीवश्च जीवनम्

मंंत्र का तू विसरला

बुुुद्धिमान माानवा तव

भ्रम भोपळा हा फुटला।।४।।


गर्वहरणाचा समय आला

सावध हो उघड नयनाला

करून उद्घोष वृृक्षसंवर्धनाचा

जगवू या चराचराला ।।५।।


एक रोपटे लावुन दारी

सुुुजल सुफल करु या वसुुंधरेला

मृण्मयी साद घालते रे

उःशापांचे तव श्वासाला ।।६।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy