प्राक्तन
प्राक्तन
कशी हि उदासी, कसे आज व्हावे
अशा प्राक्तनाचे निखारेच व्हावे
अशी हि घुसमट, एकाकीपणाची
जणू दरवळ हि, जुन्या आठवांची
कसे कोणी सांगे , कसा जन्म गेला
वरतून सारे शांत , पण आत जीव गेला
आशा ना कोठलीही , ना कोणती इच्छाही
" आलोच " असे सांगुन , मृत्यू ने घात केला