.. अन किनारे सरकत राहिले
.. अन किनारे सरकत राहिले
1 min
271
किनाऱ्याच्या पैलतिरी तू उभा
अन् ऐलतिरी मी,
आपल्या दोघांमध्ये तरंगणारा आपला भूतकाळ
तुझ्या माझ्या सारखाच, वरून शांत दिसणारा
पण पोटात वादळ साठवलेला
क्षितिजा पल्याड वाहत जाणारा
तुझ्या माझ्याच वादां सारखा
पण तरीही दिसायला सुंदर..
मला आठवतेय आपली झालेली पहिली भेट
याच नदीकाठी,
इथेच घेतला होता हातात हात
इथेच रंगवली होती पुष्कळ स्वप्ने
आणि इथेच तर पाहिला होता
एकमेकांच्या डोळ्यात एकमेकांचा भविष्यकाळ
त्या भविष्याचा गतकाळ होतानाही
इथेच आपण पाहिले
आपण तसेच स्तब्ध अन् शांत
पण किनारे सरकत राहिले...
