STORYMIRROR

Suruchi Sable

Others

4  

Suruchi Sable

Others

जशी ज्योत हळुवार मंदावते..

जशी ज्योत हळुवार मंदावते..

1 min
252

तुला भावणारी अशी जाहले मी

मला मीच नवखी आता भासते

आता शांत मी ही हळू होत आहे

जशी ज्योत हळूवार मंदावते


कडेलोट भावनांचा,स्वप्ने उराशी दाबून

चेहऱ्यावरि स्मित मी हासते

आता शांत मी ही हळू होत आहे

जशी ज्योत हळूवार मंदावते


कात टाकून जुनी ती, बंडखोर स्वभावाची

वेष पांघरून खोटा मी वावरते

आता शांत मी ही हळू होत आहे

जशी ज्योत हळूवार मंदावते


जरी जन्म घेतला वंशी मानवाच्या

निर्जीवासम जगण्या तरी लागते

आता शांत मी ही हळू होत आहे

जशी ज्योत हळूवार मंदावते


साहित्याला गुण द्या
लॉग इन