पोशिंण्दा
पोशिंण्दा
रातीला जागतोय, दिसाला राबतोय.
मातीत जगतोय, अन मातीत मरतोय.
राब राब राबतोय, मधी अवकाळी झोड्तोय.
तरीही उठ्तोय, पानेल्या डोळ्या आशा जोड्तोय.
कितीही संकटे आली जरी, जिद्दीने लढतोय.
तहानलेली जमीन पाहून, मनाच आभाळ फाडतोय.
उचलून पैजेचा ईडा, राजा जमिनीवर खेळतोय.
प्रधान मारी गप्पा मोठ्या, राजा एकटक पाहतोय.
वारा ऊन पाऊस, काहीही असूद्या नडतोय.
जनावरावर जीव लावणारा, काळोखात रड्तोय.
निंदा नालस्ति कितीही करा, शांततेचा सूर काढतोय.
भूक मीटवन्या जगाची, एकटा पोशिंण्दा पेटतोय.
