पिता एक महासागर .....
पिता एक महासागर .....
संसाराचा गाडा ओढता ओढता
बाप माझा अनपेक्षित थांबला
हजारो वेदना भावना झाकून
बाप माझा तारा तुटावा तसा लुप्त झाला ....
न थकणारा , न हरणारा , जिवन योद्ध
वयासह गर्द झोपी जातो
न वेचलेले, न सोसलेले खोल
घाव-अर्थ जीवनाला देऊन जातो..... .
मातृत्वाच्या जल्लोषात
पितृत्वाची समुद्र -ध्वनी का धूसर होऊन जाते?
नात्यांच्या बेरीज वजाबाकीत
बापाची नेहमीच बाकी शून्य राहते .....
प्रश्नार्थी बाप जो तो
नेहमीच रविराज तरी,
काजवा होऊन जागून जातो.
सर्व काही करून कर्तव
बाप नावाचा सावकार कसा पोरखा राहतो ? ....
