तरुणाई चा श्रावण
तरुणाई चा श्रावण
श्रावण सरी .....
या श्रावणात रंग तुझा
ओल्या वस्त्रातून
भिजून ओघाळला ...
चिंब ओला पदर तुझा
उभ्या श्रावणात या
अंगार देहास देऊन गेला ....
अंग अंग बिलगून तुझे
वस्त्राआडून आवाज देऊन गेले ....
भिजलेल्या भावनाचे
मर्यादेंआड नवे भावगीत गावून गेले....
थोडासा मधाळ जरी मी
मर्यादा सोडणारा अल्लड किशोर नाही....
तूच अशी धुंद - बेधुंद
मग मीही पुर्णरुपी शून्य नाही .....

