शराबी गुलाब
शराबी गुलाब
चंदनाचा देह तुझा
मिलनात गंधाळतो.
ओठांवर उघळून ओठ मी
यैवनात उतरतो...
तरुण होऊन चांद माझा
तुझ्या पौर्णिमेस उगवतो.
आलिंगनात घेऊन अंग
तुझ्या अंतरात मी उतरतो .....
एक एक पाकळी
होते तुझी माझी गुलाबी ....
ज्याचा त्याचा प्रेम गुलाब
असाच कधी ना कधी शराबी ....

