फूस..
फूस..
फूस लावुनी मला पळविलेस तू
काय यातून मिळविलेस तू
समाजाची खुणशी नजरेला वाढविलेस तू
आपोल पोटी जगात सांग साथ देणार कोण तू...
बरबाद म्हणे केली जिंदगी तूने
अपमानाचा कहर झेलला तिने
पुन्हा वा-यावर सोडून तिला
नमक हराम कंटाळवाणे केले जीणे
फुस लाविता फोडले घरदार तू
संयुक्त कुंटुंबास विभक्क्तिले तू
माणसाचा तुझा अवतार जणू पण
हैवाणच होऊन बसलास असा कसा तू
आधूनिक युगात फुस लावतो साहेबांना
बळी देऊन वेळप्रसंगी सहका-यांचा ओढीलास जाळ्यात तू
स्वतःच ओढून घेतो धन दौलत लावून फूस
दाखविती बाहेरचे वेगळी करामत दाखविलास तू
झाले युगे युगे अठ्ठावीस कलयुग आले
फुस लावणारे वाहत गेले वसाहत झाले
ख-याचे खोटे खोट्याचे खरे पण येथे
अमर, उज्ज्वल दिप बनत गेले...
