STORYMIRROR

kalyan pandurang raut

Others

4  

kalyan pandurang raut

Others

गंध मातीचा (लावणी)

गंध मातीचा (लावणी)

1 min
507

गंध मातीचा फार वेगळा 

सख्या हो...! जपून करा वार....!!धृव०!!*


तुमच्यासाठी ही नाजूक काया

मनमोहिनी मी तुमची छाया

धरणीला ह्या प्रांजळपणे लावा माया

भरदार तुम्ही व्हा स्वार... *सख्या *हो....!!१!!*


साल सतरा जपवणुक केली ज्वानी भरास आली

दाणा भरला कोंदणाचा ज्वार शेतात बहरली

यौवनाला साजेसं पिक यावं वर्ष नवं सरली

करावा आता खुशाल तुम्ही सागर ह्यो पार... *सख्या हो...!!२!!*


मिळावा क्षार धरणीला रतीभराचा आधार

फांदीवरलं फुलपाखरु हे नाजूक लावण्य सांभार

शृंगारलेली कांती घ्यावी लावून सामाचार अधिभार... *सख्या हो...!!३!!*


प्रेम माया तुमची सदाच मिळो अपरंपार

अंगाखांद्यावरती रुळावी खेळकर व्हो तुम्ही 

धरणीच्या अधरावरती घालू नका घाव

उमलगडेलं कोडं त्यामागचं तुम्ही हो लई हुशार.... *सख्या हो....!!४!!*


तीन महिने नऊ दिवसांनी रोप लागले धरणीला

माया द्या वात्सल्याची प्रेमभरी संस्कार

जीव सारा शिणलेला घेईल आकार

स्वप्न उद्याचे लवकर होईल हो साकार..... *सख्या हो...!!५!!*


Rate this content
Log in