STORYMIRROR

kalyan pandurang raut

Romance

4  

kalyan pandurang raut

Romance

पहाट मंतरलेली..(७)

पहाट मंतरलेली..(७)

1 min
467


पहाट मंतरलेली तुझ्या कवेतली

धुंद नशा मी ही पांघरलेली

तुझ्या उष्ण श्वासाने बघ वेढलेली

मऊ मुलायम तनात तुझ्या प्रिये साकारलेली....!!१!!


रम्य पहाट वेडे केश सांभार मोकळा

बाहुत माझ्या चिंब घामाने भिजलेला  

मलमली तारुण्यास मयुर पंखानी झाकलाटेकला

चुंबुन गालावरच्या खळीला हात उशासी टेकला....!!२!!


नेत्रास भिडले नेत्र तृष्णा अधुरी त्याची

लटकेच लवूनी डोळा भूक ही अधाशी

उराशी तृप्तीचे स्वप्न जवळ येते उषः जशी

खरेच तू माझी रुपवती बावनकशी....!!३!!


मिलन तुझे माझे गारवा निमाला

बोटात गुंतले हात यश आले श्रमाला

घामाजूनी मग पहाटवारा अंगास भिनला

लाजली कोमल लतिकाही अधिरता पणाला...!!४!!


झाले तनमन एक धुंदित आपापल्या

अशाच पहाट वेली केसात चेहऱ्याला झाकल्या

सावरुन कानात कुजबुजलो काही बावल्या

नेत्र कमल पापणी अलगद उलगडून नजरा तृप्तीनै फेकल्या....!!५!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance