प्रेमाचा गुलाब माझा
प्रेमाचा गुलाब माझा
धावपळ झाली तुझ्यामागे थकलो आता फार
निवांत क्षण मिळाला आता बोलू छान
गुलाबाचे देऊन फुलं पुन्हा शब्द घोळू
काढून कडवटपणा मनातील चाँकलेट मिळून खाऊ...
चाँकलेट डे आजचा मस्त करु साजरा
केसात माळून मोग-याचा गजरा
उगिच नजर चोरुनी पाहू नको
दाखवी मुखडा लाजरांन साजरा...
मन माझं बहरलं छान छान
आता होऊन जाऊ दे मोकळे काळजाचे रान
नवीपिढी घडवायाची प्रेमांकूर फुलवायची ठेवू भान
संस्कार संस्कृतीच लक्षात घेऊन मानपान...
गुंफून हाती हात दे बळ माझ्या हातांना
सदोदित मनात वसलेली तू तू तुझी भक्ती
नवनिर्मितीचा आनंद स्वप्नातील सत्यात उतरवू
जीवन बंधनातील तू अर्धागिंनी तुच माझी शक्ती..
करा गोड तोंड जरा चाखून चॉकलेटचा घास
कडू पडले तोंड ज्यांचे वाट पहा हमखास
पुढील वर्षीची आज पासून तयारी रोज खुराक
भेटेल लवंगलतिका अपणासही वाढेल क्षण ध्यास..
