रोम रोमी शहारले तुझ्या प्रीतीत
रोम रोमी शहारले तुझ्या प्रीतीत
रोमरोमी शहारले तुझ्या प्रितीत अंग माझे
जीव झुरतो तुझ्यासाठी वेडे मानू नकोस ओझे...!!धृव०!!
हळुवार झुलावे मिठीत तुझ्या खेळावे
गोड लाडीवाल शब्द नाजूक ओंठातून पडावे
स्वप्न माझ्या काळजाचे डोळ्यांतूनी दिसावे
बहरावी वेलीवरती नाजूक फुले तुझे नी माझे....
रोमरोमी शहारले तुझ्या प्रीतीत....!!१!!
शृंगार केला फुलला वसंत मनातूनी
चैन पडेना जीवा आता दिसे तू स्वप्नातूनी
आठवांची गोळा बेरीज उगावू दे मिलनातूनी
तारुण्याचा कळस सोनेरी क्षितिजा खुळून येईल नशीब माझे...
रोमरोमी शहारले तुझ्या प्रीतीत.....!!२!!
बहरु दे मनात माझ्या शितल चांदण्यांची रुणझुण
हृदय तुलाच कि मुक्त माझे होई अर्पुण
दे विसावा बाहुत भरुनी टाकते मखमली अंथरुण
दिन रात शोधित फिरते डोळ्यांत बिंब तुझे.... रोमरोमी शहारले तुझ्या प्रितीत.....!!३!!
नाद तुझा हा जन्मोजन्मीचा आजन्म राहील पाठी
ऋणानुबंधाची जुळाव्यात आपल्या प्रेम प्रीती रेशीम गाठी
थांबू, घेऊ थोडा विसावा नदीच्या काठी
अर्धांगिनी नेत्र पल्लवांची सजवू घरकूल तुझे माझे.... रोमरोमी शहारले तुझ्या प्रीतीत अंग माझे...!! ४ !!

