STORYMIRROR

kalyan pandurang raut

Others

4  

kalyan pandurang raut

Others

स्त्री शक्ती

स्त्री शक्ती

1 min
346

काही म्हणा मला अबला सबला हीन दीन

डोकच नाही तुम्हा लावता मागे किण् किण् ...!!धृ!!


लग्न होऊन हक्काच्या घरात आले माहेर विसरले

जेवणापासून खरकट्यापर्यंत मीच सारे केले

मनगटात बळ माझ्या स्वयंपाकाची कला

कायमचे तुमच्या ओठांवर गृहिणीच राहिले...!!१!!


लेकरांना जन्म दिला आई तेवढ्यापुरती

अशी कशी झाली सांगा तुम्हा उपरती

सेवा धर्म मानून सासू सासऱ्यांची केली सेवा

शेवटी नवऱ्यालाच घराचा पोशिंदा म्हणती...!!२!!


आजारात होते नर्स मी रात रात जागते

औषधी देऊन वेळेवरती काही झालं नाही म्हणते

होशील लवकर बरा म्हणून धीर मनी भरते

अजून वरती तोंड वासून म्हणतात स्त्री घरात दिनभर काय करते...!!३!!


धुणे धुते होऊन धोबी, भांडे घासते भांडेवाली

बायको, आई, पात्रे छान पुन्हा रंगविते

छान नटून थटून नवऱ्यासमोर गजरा लावून जाते

त्यांच्या डोळ्यात दिसतो सदा उधामाधा याचे दुःख भोगते...!!४!!


कधी लावून लाली ओठांवर फिरते बाहेर

नजरा साऱ्या माझ्याकडे होते करती फाईट

असं हे पाहणं फालतू पुरुषाची म्हणे काॅलर टाईट

अन्याय अत्याचार करुनी उद्ध्वस्त जीवन करणारा नराधम असतो वाईट...!!५!!


एवढे सारे करूनी समाजात मान खाली जाते

बलवान असूनी अबला बनूनी बुरख्यात मिरवते

याचं याच दिवशी वाटते नवल जेव्हा शुभेच्छा येते

बलात्काऱ्याला फाशी नाही अजून कोण कोणा फसविते...!!६!!


Rate this content
Log in