STORYMIRROR

kalyan pandurang raut

Others

4  

kalyan pandurang raut

Others

सखी माझी

सखी माझी

1 min
122

उनाड अल्लड हवी हवीशी 

हवीशी वाटे सखी माझी मला

रुसवा फुगवा खट्याळ वारा

वारा येवून भेटून जाई गळा....!!१!!


आता झाले जातीवंत संबंध तिचे माझे

माझे तिचे होई भांडण कधी शिळे, कधी ताजे

लाजून बोलते अजूनही ना दूर्गा अवतार येता

येता प्रेमबांध उफाळून राग आवरु ना कोणती काजे....!!२!!


स्वप्न आठविता मनी तिचे, याचक तिचा मोठा

मोठा आणि आधुनिक उमटविल्या प्रेमाच्या छटा

तिच्या रुपाची मोहनी मजला करित होती घाटा

घाटा अल्लड अवखळ कुरुळ्या केसावर भाललो उडत्या पाहून बटा...!!३!!


भासे मजला निलपरी ती आकाशातून उतरलेली

उतरलेली अप्सरा विश्वामित्रा साठी आसुसलेली

प्रतिसाद मिळता तिचा मग कि किती खाल्ल्या लाथा

लाथा खाऊन संसार निटनेटका अजूनी चालू रात मंतरलेली....!!४!!


सुख दुःखाची वेळ यावी बनते मजेशीर जीवन

जीवनात निघता नासके नारळ जरी देवा म्हणतो घ्या करुन पावन

म्हतारपणी तीच माझी मीच तिचा पुन्हा होईन

होईन भार कधी जवानी का पुन्हा परतूनी येईन....!!५!!


Rate this content
Log in