पदर उडतो वा-यावर बाई..
पदर उडतो वा-यावर बाई..
पदर उडतो वा-यावर बाई गं पदर उडतो वा-यावर
चित्त राही ना था-यावर बाई गं चित्त राही ना था-यावर...!!धृव.!!
पदर पडता नजर वळता वाकड्या नजरा सुरु
काय माल भारी नजर करारी दातओंठ खान झालं सुरु
काय सौंदर्य ठसठसले ठासून भरलं लावण्य नवखणी
अलगद मिठीत याला कधी भरु....
खेळ बाबल्याचा शरमिंदेचा डोक्यात चालू होई दिवस भर...पदर उडतो वा-यावर ....!!१!!
हैवाणी नजर त्याची सारं नातंगोतं विसरते
निर्लजपणाचा कळस सारा माणसातील माणसाला सांगतो
वचने संताची, कवणे,दोहे ज्ञान मोठमोठ्ठोयाने ठोकतो
नाजूक बांधा,लवती कमर चवळीची शेंग डोळ्यासमोर आठवतो....
ईच्छा पुरी होत नाही सा-यांची संसारभर ...पदर उडतो वा-यावर ....!!२!!
काळ रात वैराची,कोणी झडप घालतो हैवाण
काळजावरती घालून घाव चराचराव बांधतो धरण
ओरबाडून सौंदर्य तिचं वासना त्याची का? क्षमते
नाकीडोळी छान,सिंह कटीवर मान कबुतरं धरती ताल मागणी वाढते ...
गुणगुणत राहतो हालते मान दिवसभर...पदर उडतो वा-यावर ....!!३!!
संशयाचा महामेनु येता गावाच्या नजरेला
रीघ लागते पाहण्याला दर्शन तिचे घेण्याला
ज्वानीचे सारे भक्त शर्यत लावती भिडण्याला
दातओठ खाऊन मिठमिरचू लावून सांगण्याला...
शिमगा गावात सा-या फरक ना पडतो वागण्यावर....पदर उडतो वा-यावर ....!!४!!
काय पडलं कोणालाही ? कोण होती ती अशी
समाजातील बहीण,बेटी, काकी,आई,मावशी
मामी,आत्या,सुन,जाऊ,नणंद मिरवती नाते कशी
समाज धुरिणांनाचा काय उपयोग सांगा बेइज्जतीच्या राशी....
कोण वाहील भार त्यांच्या सुज्ज्वल संपन्नतेचा खांद्यावर...पदर उडतो वा-यावर बाई गं पदर...!!५!!
