प्रपोज...
प्रपोज...
प्रपोज केले तिला
भाव तिचा वाढला
गुलाब पाहून हाती
चेहऱ्यावर गुलाब फुलला...!!१!!
झालो वेडा तिच्यासाठी
तिलाच काळीज मानलं
सर्वस्व देऊन तिला
दैवत्व तिच्यात जाणलं...!!२!!
आय लव्ह यू देवता
येऊ दे कितीही संकट
हृदयावर झेलीन वार
आमचे संबंध अतूट...!!३!!
नटखट ललना माझी मला
मिळाली आता नाही मागणं
काळजात ठेवून सांभाळीन तिला
नेहमी करता हेच तुला सांगणं...!!४!!
राजा रोज बोले गप्पा मारेन
तुला नको तिची काळजी
गालावरच्या खळीला देईन खाऊ
माझीच सारी राहील मर्जी...!!५!!

