फुललेलं फुल
फुललेलं फुल
वयाच मध्य गाठल्यावर कळतं
बालपण नक्की काय असतं
रडताना डोळे भिजत नाहीत
बघताना जाणीव होत नाहीत
हसताना काहीतरी राहून जातं
चालताना पायातलं गळून पडतं
विचार विचांरात असं काहीसं
परत यावं आहे तसं
खेळणं बागडणं कायमचं जाऊन
फुललेलं फुल गेलं कोमेजून
