STORYMIRROR

Anagha Kamat

Inspirational

3  

Anagha Kamat

Inspirational

फुलझाडांची खुशाली

फुलझाडांची खुशाली

1 min
249

बागेत आमच्या हंसली चमेली 

फुलून गेली अबोल अबोली 

शेवंती पिवळी तर बहरून गेली 

मोगरीची लता भलतीच आनंदली 


जाई जुईला नवीन टवटवी आली 

सदाफुली सदाबहार नाचू लागली 

लाल जास्वंदी अतोनात फुलली 

गुलाबाच्या पाकळ्यांची रंगत वाढली 


हिरव्या चाफ्याची कमालच झाली 

चाफ्याची कळी लपूनच राहिली

कुंडींतली गुलाबी लिली हंसली 

सोनचाफ्याला सोन्याची झळाळी आली 


कुंदीच्या जाळीची धुंदी पसरली 

भरगच्च अनंताची दृष्टच काढली 

नवीन लावलेली गोकर्ण शोभली 

कृष्णकमळीची वेल सजली धजली 


कवठी चाफ्याने मान डोलावली 

रातराणी तर दिवसाही भुलली 

फुलांची आरास पाहात मी चक्कर टाकली 

सगळ्या फुलझाडांची मला खुशाली कळली.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational