फुल म्हणालं झाडाला
फुल म्हणालं झाडाला
फुल म्हणालं झाडाला
आज का तोडलं नाही मला
आज आम्ही सगळेजण
आहोत कसे संगतीला
रोज आम्ही तुटतो
देवघरात भेटतो
आठवडाभर झाले आम्ही
झाडावरचं बसतोय
झाडावरचं फुलतोय
झाडावरचं कोमेजतोय
झाड म्हणालं फुलांना
काहीतरी घडलंय
माणसाजवळ माणूस
यायचंच विसरलय
कोणीसुद्धा फिरकेना
आज जवळपास
जसं झालंय वातावरण
पूर्णपणे भकास
बहुतेक झालायं कोरोना
आपल्या मालकाला
म्हणून तुम्ही लटकताय
इतके दिवस फांदीला
त्यांच्या बरोबर आपण
बहुतेक क्वारंटाईन झालोय
इतके दिवस आपण
हेच तर पाहतोय
येणार नाही कोणी जवळ
अजून चौदा दिवस
एकत्र राहू आपण
अजून तितके दिवस
फुल म्हणालं झाडाला
असं कसं झालं
भरलेल्या वस्तीत घर
एकट कसं झालं
कोणी नाही आलं तरी
आम्ही आहोत संगतीला
बहरून टाकू आम्ही
फुलाप्रमाणे आयुष्याला
सुगंधित करू घरदार
बहरून एकत्र झाडाला
********************
