"फक्त तुझी साथ हवी"
"फक्त तुझी साथ हवी"
बदलविण्या महाराष्ट्र सारा
वर्षविण्या इथे घामाच्या धारा
घडविण्या जगी क्रांती नवी ,
मज "फक्त तुझी साथ हवी" ॥
आणण्या कातळांना कळा सोनियाची
माळरानावर काढू पिके मोतियांची
भुकेल्याना सदा देण्या भाकरी
मज "फक्त तुझी साथ हवी" ॥
चालविण्या देशातील प्रत्येक साचा
हाती घेऊ हात भविष्याचा
देशात सदा नांदण्या शांती
मज "फक्त तुझी साथ हवी" ॥
परशत्रूशी जवान लढती
प्राणांचे बलिदानही करती
उभारण्या हे निशाण तिरंगी
मज "फक्त तुझी साथ हवी" ॥
असेल अपुला पुर्नजन्म तर
पुन्हा जगावे याच भुमीवर
करण्या देशासाठी मागणी
मज "फक्त तुझी साथ हवी" ॥

