STORYMIRROR

RohiniNalage Pawar

Romance

4  

RohiniNalage Pawar

Romance

फक्त तुझी साथ हवी आहे

फक्त तुझी साथ हवी आहे

1 min
549

अंधारलेल्या मनाला

प्रकाशाची एक किरण हवी आहे,

थरथरत्या हातांना बिलगणारी

तुझी साथ हवी आहे...||१||


नकारात्मक विचारांना

सकारात्मक विचारांची जोड हवी आहे,

खचलेल्या मनाला उभारी घ्यायला

फक्त तुझी साथ हवी आहे...||२||


रडल्यावर हसू आणणारी

तुझी ती डेअरी मिल्क हवी आहे,

संकटांना सामना करायला

तुझ्या विश्वासाची साथ हवी आहे...||३||


मी रागवल्यावर शांत करणारी

तुझी ती नटखट नजर हवी आहे,

आपल्या नात्याला घट्ट करणारी

तुझी पाऊलोपाऊलीची साथ हवी आहे...||४||


सुखाच्या ओघात न भरकटणारी

नि दुःखात सावरणारी मिठी हवी आहे,

दुःखांना वाट मोकळी करून द्यायला

फक्त तुझी साथ हवी आहे...||५||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance